सणावाराच्या दिवसांमध्ये सेलिब्रिटी स्टाईलने नेसा पैठणी साडी
पैठणी साडीवर लुक आणखीनच उठावदार दिसण्यासाठी तुम्ही साडीचा पदर हातांवर ठेवू शकता. यामुळे तुमचा लुक स्टयलिश आणि मराठमोळा दिसेल. पैठणी साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते.
सोन्याची जर असलेल्या पैठणी साडीवर आरी वर्क केलेले सुंदर ब्लाऊज सुंदर दिसेल. काहींना पदराच्या बारीक बारीक प्लेट काढायला खूप जास्त आवडतात. साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी गळ्यात एखादा मराठमोळा दागिना परिधान करावा.
पैठणी साडीवर कॉन्ट्रास्टरंगाचा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. लाल किंवा गुलाबी रंगाची पैठणी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही हिरव्या किंवा जांभळ्या रंगाचा सुंदर नक्षीकाम केलेला ब्लाऊज घालू शकता.
अनेकांना स्लिव्हलेस ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या पैठणी साडीवर तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज घालू शकता. यामुळे तुमचा लुक स्टायलिश दिसेल.
घरातील सत्यनारायणाच्या पूजेसाठी तुम्ही पैठणी साडीची नऊवारी साडी नेसू शकता. हळदीकुंकू समारंभात उठून दिसण्यासाठी पैठणी साडीची नऊवारी साडी अतिशय सुंदर दिसेल.