सौंदर्यात पडेल भर! नवरात्री उत्सवात साडीवर शिवा 'या' डिझाईनचे लांब हातांचे ब्लाऊज
कॉटन किंवा शिफॉन फॅब्रिकमध्ये साडी नेसल्यानंतर तुम्ही या पद्धतीने फुग्यांच्या हाताचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. हे ब्लाऊज खूप स्टायलिश आणि आकर्षक लुक देतात.
हल्ली लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजची मोठा ट्रेंड आला आहे. काठपदर किंवा कोणत्याही सिल्क साडीवर लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊज शिवून घेतले जाते. या ब्लाऊजवर तुम्ही आरी वर्क सुद्धा करून घेऊ शकता.
बनारसी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवू शकता. कोणत्याही डार्क रंगाच्या साडीवर हिरव्या किंवा गुलाबी रंगाचा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो.
डिझायनर लेहेंगा किंवा साडी नेसल्यानंतर त्यावर आरी वर्क किंवा स्टोन वर्क केलेले ब्लाऊज तयार करू शकता. आरी वर्क कोणत्याही साडीवरील किंवा लेहेंग्यावरील ब्लाऊजवर अतिशय सुंदर दिसते.
सणावाराच्या दिवसांमध्ये कांजीवरम सिल्क साडी मोठ्या प्रमाणावर नेसली जाते. यासाडीवर तुम्ही नेटसोबत एम्ब्रॉयडरी, झरी किंवा झरीचे पॅचवर्क केलेले ब्लाऊज शिवू शकता.