नवरात्रीपर्यंत चेहरा दिसेल अतिशय चमकदार! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'हे' क्रीम
देशभरात लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. देवीचे आगमन झाल्यानंतर मनोभावे पूजा करून अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाची आयोजन केले जाते. नवरात्री उत्सव सुंदर दिसण्यासाठी महिला काही दिवस आधी फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा फोड घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण तरीसुद्धा काहीच फरक दिसून येत नाही. त्वचा सुंदर आणि कायमच चमकदार ठेवण्यासाठी शरीराला पोषण देणे आवश्यक आहे. स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेचा वरचा थर सुधारतात. ज्यामुळे काही काळापुरते चेहऱ्यावर पिंपल्स किंवा इतर कोणत्याही समस्या दिसून येत नाहीत. पण वारंवार केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केल्यास त्वचा अधिकच खराब आणि निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य: Pinterest)
उत्सवाच्या दिवसांमध्ये चारचौघांमध्ये उठावदार दिसण्यासाठी मेकअप केला जातो. पण सतत मेकअप किंवा इतर कोणत्याही ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला नवरात्री उत्सवात सुंदर दिसण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोणते क्रीम लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या क्रीममुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल.
सुंदर दिसण्यासाठी कायमच वेगवेगळ्या क्रीम किंवा इतर वेगवेगळे लोशन लावले जातात. पण तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताही फरक दिसून येत नाही. त्यामुळे त्वचा सुंदर ठेवण्यासाठी कायमच घरगुती आणि नॅचरल प्रॉडक्टचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नाईट क्रीम लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासोबतच भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
नाईट क्रीम तयारीत करण्यासाठी सर्वप्रथम, स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ वाटीमध्ये घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी गाळून त्यात कोरफड जेल टाकून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात बदाम तेल आणि विटामिन ई कँप्सूल टाकून व्यवस्थित क्रीम मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काचेच्या डब्यात भरून ठेवा. तयार केलेली क्रीम फ्रिजमध्ये ठेवून द्या. यामुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या किंवा बारीक रेषा कमी होऊन जाते.