भारताची मॉडर्न अभिनेत्री इशा गुप्ता नेहमी तिच्या फोटोजमुळे चर्चेत असते. मिस इंडिया आणि मिस इंटरनॅशनल म्हणून राहिलेली इशा गुप्ता पुन्हा तिच्या हॉट फोटोजमुळे चाहत्यांच्या चर्चेत आली आहे. दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना, इशा गुप्ताने तिचा छानसा फोटो शूट केला आहे. या फोटोजमध्ये इशाने परिधान केलेला आऊटफिट फार आकर्षक ठरत आहे.
इशा गुप्ताचा दुबईमधील फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री इशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर आकर्षक फोटोज शेअर केले आहेत. अभिनेत्रीचा आउटफिट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या फोटोजमध्ये अभिनेत्री इशा गुप्ता आकर्षक अशा पांढऱ्या रंगाच्या आउटफीट दिसून येत आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
मध्यम आकाराचे केस, कानामध्ये इअररिंग्ज. तिच्या रूपाची शोभा वाढवत आहेत. तिचा सौम्य मेकअप तिच्या सौंदर्याचे तेज आणखीन वाढवत आहे.
इशाने तिच्या पोस्टखाली कॅप्शन दिले आहे. त्यात तिने म्हंटले आहे कि, " Tatel आता दुबईमध्ये... उदघाटन सोहळ्यासाठी @tatelrestaurants ला अभिनंदन."
Tatel च्या दुबईमधील नव्या रेस्टोरंटच्या शुभारंभासाठी अभिनेत्री इशा गुप्ता तेथे उपस्थित होती. तिच्या या नव्या लूकमुळे ती सध्या चर्चेत आहे.