अलीकडे चिया सीड्स लोकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारख्या पौष्टिक घटक आढळतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, पोषक तत्तवांनी समृद्ध असलेले चिया सीड्स आरोग्यास हानिकारक देखील ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत चिया सीड्सचे दुष्परिणाम
चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. परंतु या सीड्सचे अति सेवनाने गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
चिया सीड्स पाण्यात टाकल्यावर फुगतात आणि त्यांचा आकार दुप्पट होतो. पुरेसे पाणी न पिल्यास अन्ननलिकेमध्ये या बिया अडकू शकतात.
कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी चिया सीड्सचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. त्यात असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिडमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
इरिटेबल बोवेल सिंड्रोम, कोलायटिस, क्रोहन रोग अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बियांचे सेवन करू नये.
चिया सीड्सची ऍलर्जी असेल तर अशा लोकांना उलट्या, मळमळ, अतिसार, जीभ आणि ओठांवर खाज सुटू शकते. काळजी न घेतल्यास, यामुळे ॲनाफिलेक्सिस सारखी धोकादायक परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते.
चिया सीड्स वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. परंतु या बियांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे वजन कमी न होता वाढते.