काठपदर- नऊवारी साडीवर शोभून दिसतील 'हे' मराठमोळे दागिने, पाहतच क्षणी सगळे करतील कौतुक
मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर खुलून दिसतात. त्यामुळे मोत्याची चिंचपेटी, तन्मणी किंवा मोत्याची नथ घालू शकता. मोत्याचे दागिने नऊवारी साडीवर सुंदर दिसतात.
पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांमधील आतील जुना दागिना म्हणजे मोहनमाळ. सोन्याचे बारीक मणी माळेत गुंफले जाते. हि माळ पूर्वीच्या काळी सर्वच महिला परिधान करत होत्या.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी साज सर्वच महिलांचा आवडता दागिना आहे. नऊवारी साडी आणि काठपदर, पैठणी इत्यादी सर्वच साड्यांवर कोल्हापुरी साज आकर्षक दिसतो.
बारीक मण्यांची गोलाकार ठुशी राजेशाही आणि मनमोहक लुक देते. साडीचा ड्रेस किंवा अनारकली शिवल्यानंतर त्यावर तुम्ही ठुशी दागिना घालू शकता.
लग्नात तुम्हाला पारंपरिक लुक हवा असेल तर बारीक पुतळ्यांची माळ परिधान करू शकता. पुतळी हारावर लक्ष्मी आणि इतर देवी देवतांची रूप असतात.