नऊवारी साडीवरील सौंदर्य आणखीनच खुलून दिसण्यासाठी परिधान करा 'या' सुंदर डिझाईनच्या नथ
नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने महिला मराठमोळा लुक करतात. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या मोत्यांची नथ नाकामध्ये घालू शकता. यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
काठपदर किंवा हेवी पैठणी साडी नेसल्यानंतर या डिझाईनच्या नथ अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. सध्या सोशल मीडियावरील पेशवे कालीन नथींचा मोठा ट्रेंड आहे.
मराठमोळा लुक आणखीनच सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी तुम्ही पांढऱ्या, लाल, हिरव्या रंगाचा वापर करून बनवलेली नथ परिधान करू शकता. यामध्ये लुक अतिशय स्टयलिश दिसेल.
सर्वच महिलांना पांढऱ्या मोत्यांची नथ खूप जास्त आवडते. त्यामुळे तुम्ही मोठ्या आकाराची नथ नऊवारी किंवा सहावारी साडीवर घालू शकता.
हल्ली चंद्रकोरीच्या डिझाईनमध्ये सुद्धा नथ तयार करून मिळते. याशिवाय हाताने तयार केलेल्या दागिन्यांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डायमंड खड्यांचा वापर करून तुम्ही नथ बनवू शकता.