Father's Day 2025: फार कष्ट घेण्याची गरज नाही फक्त या गोष्टी करा आणि आपल्या वडिलांचा दिवस बनवा खास
थँक यु कार्ड - अनेकदा आपल्याला आपल्या वडिलांचे प्रेम, कष्ट दिसतात मात्र त्यासाठी त्यांचे आभार मागण्याची संधी कधी मिळत नाही. अशात फादर्स डे निमित्त तुम्ही एक छान कार्ड तयार करून यात आपल्या मनातील भावना आपल्या वडिलांपर्यंत पोहचवू शकता आणि त्यांचे आभार मानू शकता.
एक खास संध्याकाळ - वडिलांचा हा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी एक संध्याकाळ त्याच्या नावी करा. यासाठी काय करावं तर तुम्ही तुमच्या वडिलांच्या आवडीचं जेवण, गाणी किंवा त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करू शकता, आपले अनुभव शेअर करू शकता किंवा त्यांच्यासोबत काही जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.
फोटो फ्रेम - अनेकदा ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्या फोटोतून व्यक्त होतात आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो. आपल्या वडिलांचे सर्व जुने फोटो एकत्र करा आणि त्यांचा एक कोलाज बनवत त्यांना ही फोटोफ्रेम गीफ्ट करा. ही आनंदाची साठवण त्यांना नक्कीच फार आवडेल
विश्रांती द्या - अनेकदा घरातील सर्व लहानमोठी काम जसं की, बँकेचे काम, लाईट भरणे, बाजारातून कोणती गोष्ट घेऊन येणे हे आपले वडिल करत असतात. अशात या खास दिवशी त्यांना आराम घेऊ द्या आणि पुढाकार घेऊन ही सर्व कामे तुम्ही करा. आपली जबाबदारी बाळगून तुम्ही केलेली ही कामे पाहून तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटेल
एकत्र वेळ घालवा - याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वडिलांसोबत एकत्र वेळ घालवू शकता. त्याच्यासोबत त्यांच्या आवडीचा चित्रपट बघायला जा अथवा त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जा. यादिवशी त्यांच्यासोबत एक मोकळा संवाद साधा आणि त्यांना काय हवं नको ते पहा.