भारतीयांमध्ये मोबाईल गेम्सची प्रचंड क्रेझ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वचजण त्यांच्या मोकळ्या वेळात मोबाईल गेम्स खेळत असतात. रेल्वे, बस, घर सर्वत्र आपल्याला मोबाईल गेम्स खेळणारी माणसं पाहायला मिळतील. भारतात अनेक मोबाईल गेम्स खेळले जातात. पण त्यापैकी काही गेम्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
फोटो सौजन्य - pinterest

Subway Surfers हा मोबाईल गेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खेळू शकतात. हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता नसते. या गेममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नाणी गोळा करत पोलिसांपासून वाचायचं असतं.

या यादितील दुसरा गेम आहे candy crush saga. हा गेम तुम्ही तुमच्या फेसबूक अकाऊंटला कनेक्ट करून नवीन मित्र बनवू शकता. तुम्ही जसजसं या गेममध्ये पुढे जाता तुम्हाला अनेक कठीण लेव्हलचा सामना करावा लागतो.

ludo king हा भारतातील आवडत्या मोबाईल गेम्सपैकी एक आहे. अनेकांना आवडणाऱ्या क्लासिक बोर्ड गेमवर आधारित असणारा हा गेम आहे. तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पध्दतीने हा गेम खेळू शकता.

Battle royale गेम PUBG भारतातील मोबाईल गेमर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. PUBG मोबाईलमधील ग्राफीक्स गेमर्सना आकर्षित करते. अद्यापही भारतीयांमध्ये PUBG ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे.

Garena Free Fire हा देखील PUBG सारखाच एक गेम आहे. भारतात खूप लोकप्रिय असणारा आणि सर्वात जास्त खेळला जाणारा मोबाईल गेम म्हणजे Garena Free Fire.

Carrom Pool : Disc Game हा टेबलटॉप गेमचे मोबाइल व्हर्जन आहे. हा मल्टीप्लेअर गेम आहे. जो तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन अशा दोन्ही पध्दतीने खेळू शकता.

Among Us हा मोबाईल गेम 2018 मध्ये रिलीज करण्यात आला. मात्र 2020 मध्ये यूट्यूबर्स आणि स्ट्रीमर्समुळे हा गेम अधिक लोकप्रिय झाला. हा एक मल्टीप्लेअर गेम आहे ज्यात सुमारे 10 खेळाडू असतात.






