हातमागावर विणण्यात आलेली अस्सल पैठणी साडी ओळखण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
हातमागावर विणण्यात आलेली पैठणी साडी अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते. साडीच्या पदरावर दोन्ही बाजूने सारखेच धागे असतात. याशिवाय साडीचा पदर आणि साडीची बॉर्डर एकसारखी दिसते.
हातमागावर तयार करण्यात आलेली अस्सल पैठणी साडी कधीच काळी पडत नाही. मात्र मशीनवर तयार करण्यात आलेली पैठणी काही दिवसांमध्ये लगेच काळी दिसू लागते.
अस्सल पैठणी साडीची किंमत १० हजारांपासून ते १ किंवा २ लाखांच्या आसपास आहे. हातमागावर विणलेल्या साडीसाठी सोन्याची किंवा चांदीची जर वापरली जाते. ज्यामुळे साडीचे धागे निघून येत नाहीत.
हातमागावर विणण्यात आलेली अस्सल पैठणी साडी तीन ते चार पिढ्या वापरू शकतील. ही पैठणी साडी लवकर खराब होत नाही. हातमाग पैठणी साडी लवकर खराब होत नाही.
पैठणी साडीचे धागे वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा लग्न समारंभात तुम्ही पैठणी साडी सहज परिधान करू शकता.