महागड्या साड्यांवरील अस्सल जरीचा काठ ओळखण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
ओरिजनल पैठणी साड्या सोन किंवा चांदीचा वर्क लावून तयार केल्या जातात. या साड्यांना नैसर्गिक चमक असते. सूर्यप्रकाशात गेल्यानंतर जरीच्या साड्या अतिशय आकर्षक आणि उठावदार दिसतात.
खऱ्या जरीच्या साडीचा काठ धातूंच्या धाग्यांपासून बनवला जातो. त्यामुळे साडीचा काठ हात लावल्यानंतर थोडासा जाड वाटू लागतो. मात्र बनावट जरीचा वापर करून बनवलेली साडी अतिशय हलक्या दर्जाची असते.
धातूच्या धाग्यांचा वापर करून बनवलेल्या जरीच्या काठाचे घागे निघून येत नाहीत. हे ओळखण्यासाठी तुम्ही काठाच्या शेवटच्या टोकातील एखादा धागा काढून तपासू शकता.
स्वस्त जरीचा वापर करून बनवलेली साडी अतिशय स्वस्त आणि माफक दरात विकली जाते. पण सोन किंवा चांदीच्या जरीचा वापर करून बनवलेली साडी किमतीने अतिशय महाग असते.
अस्सल जरीची साडी विकत घेतल्यानंतर तिची योग्य काळजी घ्यावी. अन्यथा जरीचा काठ खराब होऊ शकतो.