केसांच्या सौंदर्यात भर घालणारा गजरा आरोग्यासाठीही फायदेशीर
गजरा बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या रंगीत फुलांचा वापर केला जातो. मोगरा, जाई, अबोली किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून सुंदर आणि भरीव गजरा बनवला जातो. याशिवाय गजरा बनवताना ताज्या फुलांचा वापर करतात.
केसांमध्ये सुगंधी गजरा घातल्यास शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. चमेली आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध ताण कमी करतो आणि मन फ्रेश होते.
गजरा घातल्यामुळे सकारात्मक विचार मनात येऊन मानसिक संतुलन सुधारते. तसेच शरीराच्या मज्जासंस्थेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे काही महिला नियमित केसांमध्ये गजरा किंवा फुल घालतात.
गजरा हे समृद्धी, प्रेम आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक मानले जाते. यामुळे स्त्रीच्या सौंदर्यात वाढ होते. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सोळा अलंकारांमध्ये गजरा घालून केस सजवण्याची परंपरा आहे.
लग्नाच्या दिवशी नववधूच्या केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा असतो. यामुळे वधू मोठ्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने नवीन जीवनात प्रवेश करते. दक्षिण भारतात वधूच्या वेणीमध्ये मोगऱ्याचा गजरा घातला जातो.