goddess japan and india (1)
सरस्वती देवी आणि देवी बेनझाईतेन : बेनझाईतेन देवी (Benzaiten) ही जपानी संस्कृतीतील एक अत्यंत पूजनीय देवी आहे. हिंदू धर्मातील सरस्वती आणि देवी बेनझाईतेन याचं रुप साधारण सारखंच आहे. जपानमध्ये विकसित झालेल्या या देवीला ज्ञान, संगीत, कला, वाणी, पाणी आणि संपत्तीची देवता मानले जाते.
लक्ष्मी देवी आणि देवी किशोतेन : देवी किशोतेन ही जपानी बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाची देवी मानली जाते. जपानमध्ये तिला Kishōten किंवा Kisshōten या नावांनी ओळखले जाते. भारतीय हिंदू धर्मातील लक्ष्मी देवीशी तिचं मूळ स्वरूप जोडलेले आहे.
इंद्र देव आणि तैशाकुटेन : तैशाकुटेन ही जपानी बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाची देवता आहे. तैशाकुटेनचा उगम भारतीय वैदिक परंपरेतील इंद्रदेव यांच्याशी जोडलेला आहे.
वरुण देव आणि सुतेन : सुतेन ही जपानी बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाची देवता आहे. सुतेन या नावाचा अर्थ जलदेवता असा होतो. सुतेनचा उगम भारतीय वैदिक परंपरेतील वरुणदेव यांच्याशी जोडलेला आहे.
अग्नि देव आणि कातेन : कातेन ही जपानी बौद्ध व शिंतो परंपरेतील एक महत्त्वाची देवता आहे. कातेन या शब्दाचा अर्थच अग्नी देवता असा होतो. कातेनचा उगम भारतीय वैदिक परंपरेतील अग्निदेव यांच्याशी संबंधित आहे