जुन्या बनारसी साडीला द्या मॉर्डन टच! आईच्या जुन्या साडीपासून शिवा 'या' डिझाईनचे सुंदर ड्रेस
जुन्या बनारसी साडीपासून तुम्ही ट्रेंडिंग 'को-ऑर्ड सेट' शिवू शकता. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे 'को-ऑर्ड सेट' उपलब्ध आहेत. 'को-ऑर्ड सेट' शिवण्यासाठी लाल किंवा गुलाबी रंगाच्या साडीचा वापर करावा.
बनारसी साडीपासून तुम्ही अनारकली ड्रेस शिवून घेऊ शकता. अनारकली ड्रेस लग्न किंवा इतर कोणत्याही सणाच्या दिवशी तुम्ही घालू शकता.
को-ऑर्ड सेट वर तुम्ही स्टाईल करताना स्टयलिश जॅकेटसुद्धा घालू शकता. यामुळे तुम्हाला अधिक मॉर्डन आणि एलिगंट लुक मिळेल.
काहींना अतिशय मॉर्डन कपडे घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही बनारसी साडीपासून या डिझाईनचा को-ऑर्ड सेट शिवून घेऊ शकता.
पारंपरिक बनारसी साडीवरील लुक आणखीनच स्टयलिश दिसण्यासाठी तुम्ही ड्रेस आणि सिगारेट पॅण्ट शिवून घेऊ शकता. हा ड्रेस तुम्ही घरातील कोणत्याही कार्यक्रमात घालू शकता.