भारताचं रहस्यमयी मंदिर, मंदिर जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब... सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का
हे चमत्कारी मंदिर गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे, त्याचे नाव स्तंभेश्वर आहे आणि हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. याची खास गोष्ट म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा इतक्या उंच होतात की संपूर्ण मंदिर पाण्यात बुडते. यामुळेच या मंदिराला गायब मंदिर या नावानेही ओळखले जाते
मंदिराचे नाव स्तंभेश्वर महादेव मंदिर असून जेव्हा भरती येते तेव्हा समुद्राच्या लाटा थेट गर्भगृहात पोहोचतात आणि त्यामुळे लाटा भगवान शिवलिंगाला स्पर्श करतात आणि जलाभिषेक करतात. लोकांचा असा विश्वास आहे की, शतकानुशतकांपासून असे घडत आहे. या नैसर्गिक क्रियेला लोक भगवान शिवाची लीला मनात आहेत
इतिहासकारांचा असा दावा आहे की स्तंभेश्वर महादेव मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वी सापडले होते. त्यामुळे हे मंदिर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे आणि हे अनोखे मंदिर पाहण्यासाठी लोक दररोज समुद्राच्या भरती-ओहोटीत शिवलिंगाचे दर्शन घेतात. शिवरात्री आणि श्रावणात इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते
या मंदिराच्या बांधकामाची कथा स्कंद पुराणात आढळते, असा दावा केला जातो की भगवान शिव यांनी तारकासुर राक्षसाला वरदान दिले होते की तो फक्त त्याच्या मुलाकडूनच मारला जाईल आणि नंतर भगवान कार्तिकेय यांनी अवघ्या 6 दिवसांच्या वयात तारकासुराचा वध केला. जेव्हा त्यांना कळले की तारकासुर भगवान शिवाचा भक्त आहे, तेव्हा त्यांनी या पापापासून मुक्त होण्यासाठी येथे शिवमंदिर बांधले.
लोकांमध्ये आजही हे मंदिर स्तंभेश्वर तीर्थ या नावाने लोकप्रिय आहे. शिवलिंगाला समुद्राच्या पाण्याने अभिषेक केला जातो आणि मंदिराच्या गायब होण्याचा चमत्कार पाहण्यासाठी लोक दूरदूरवरुन इथे येतात