‘ओएमजी 2’ मधल्या ‘हर हर महादेव’ गाण्यात अक्षय कुमारचं तांडव नृत्य, पाहून अंगावर येईल शहारा
अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘ओमजी2’ची (OMG 2) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. अशातचं चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्या गाण्याचं नाव ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev Song) असं असून गाण्यामध्ये भगवान शंकराच्या रुपात अक्षय कुमारने तांडव केल्याचं दिसतंय.