जम्मू ते बारामुल्ला: पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर. भारताचं नंदनवन म्हणून काश्मीरला ओळखलं जातं. डोंगर दऱ्यातून जाणारी ही जंगस सफर हृदयात धडकी भरवणारी आहे.
कांगडा घाट रेल्वे मार्ग: कांगडा घाट रेल्वे मार्ग हा निसर्गाचा अदभुत नाजारा आहे. या ठिकाणची जंगल सफारी अनुभवण्यासाठी पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात.
कालका ते शिमला: कालका ते शिमला ही रेल्वेसफर डोंगर दऱ्याच्या सौंदर्याचा अनुभव देते. हरीयाणा आणि हिमाचल प्रदेश दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचा प्रवास अनुभव घेण्यासाठी पर्यटक कायमच पसंती देतात. . कालका ते शिमला 96 किलोमीटरचं अंतर 5 तासांत पार करते.
दार्जीलींग: निसर्गाच्या सान्निध्यात रेल्वेची प्रवास अनुभवण्यासाठी एकदा तरी दार्जिलिंगला भेट नक्की द्या. पश्चिम बंगाल येथील दार्जीलींग हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दार्जीलींगमधील रेल्वेप्रवास हा स्वर्गसुखाचा अनुभव देणारा आहे.
कन्याकुमारी ते त्रिवेन्द्रम: अरबी समुद्र, बंगलचा उपसागर आणि हिंदी महासागर या तीनही महासागरांना पाहण्यासाठी विलक्षण अनुभव मिळतो ते त्रिवेन्द्रम रेल्वे सफारी. खास ही रेल्वे सफारी अनुभवण्यासाठी खास पर्यटक कन्याकुमारी कन्याकुमारी येथे भेट देतात.