Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

Luxury Hotel : स्वीडनच्या लॅपलँडमध्ये झाडांवर उभारलेले ट्रीहोटेल पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात आलिशान वास्तव्याचा अनुभव देते. अनोख्या डिझाइनमुळे ते जगातील टॉप 1% हॉटेल्समध्ये गणले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 08:15 AM
जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

Follow Us
Follow Us:
  • जगभरात अनेक निरनिराळे हॉटेल्स आपण पाहिले असतील.
  • पण एक असे हॉटेल ज्याच्या खोल्या झाडावर लटकत आहेत असं दृश्य तुम्ही पाहिलं आहे का?
  • हे अनोखं हॉटेल स्वीडनमध्ये वसलेलं आहे.
कधी तुम्ही झाडांच्या शेंड्यावर, हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात लटकणाऱ्या आलिशान रूममध्ये राहण्याचा विचार केला आहे का? जर नाही, तर आता कल्पना करा! स्वीडनमधील लॅपलँड या निसर्गरम्य प्रदेशात असा अनोखा अनुभव खरोखरच मिळतो. हाराड्स गावाजवळ उभारलेले Treehotel आपल्या वेगळ्या संकल्पना आणि रचनेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. २०१० साली ब्रिट्टा आणि केंट लिंडवॉल यांनी या हॉटेलची सुरुवात केली. निसर्गाच्या सान्निध्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

हॉटेलमागची प्रेरणादायी कथा

या आगळ्यावेगळ्या हॉटेलची कल्पना केंट लिंडवॉल यांना The Tree Lover ही स्वीडिश डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर सुचली. त्यानंतर विविध आर्किटेक्ट्सच्या मदतीने ही कल्पना वास्तवात उतरवण्यात आली. हे ठिकाण Arctic Circle जवळ असल्यामुळे पर्यटकांना Aurora Borealis म्हणजेच नॉर्दर्न लाइट्स आणि ‘मिडनाईट सन’सारखी अद्भुत नैसर्गिक दृश्ये पाहण्याची संधी मिळते. येथील खोल्या जमिनीपासून सुमारे ४ ते १० मीटर उंचीवर बांधल्या असून, झाडांना कोणतीही हानी न पोहोचवता त्यांची रचना करण्यात आली आहे.

आठ वेगवेगळ्या थीम असलेल्या खोल्या

  • या ट्री हॉटेलमध्ये एकूण आठ वेगवेगळ्या डिझाइनच्या खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीचा अनुभव वेगळा आहे.
  • मिररक्यूब – आरशांनी झाकलेला घनाकार, जो सभोवतालच्या जंगलात मिसळून जातो.
  • यूएफओ – उडत्या तबकडीसारखा आकार आणि १९७० च्या दशकाची झलक असलेले इंटीरियर.
  • बायोस्फीअर – सुमारे ३४ चौरस मीटरचा काचेचा क्यूब, ज्यावर ३५० बर्ड बॉक्स लावलेले आहेत. येथे ३६० अंशांचा
  • निसर्गदृश्य अनुभव आणि रूफटॉप टेरेसची सुविधा आहे. येथे एका रात्रीसाठी किमान भाडे सुमारे ४० हजार रुपयांपासून सुरू होते.
  • याशिवाय बर्ड्स नेस्ट, ब्लू कोन, द केबिन, ड्रॅगनफ्लाय आणि 7वा रूम अशा इतर अनोख्या संकल्पनाही येथे पाहायला मिळतात.
‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

जगातील टॉप १% हॉटेल्समध्ये स्थान

या हॉटेलची मुख्य इमारत ‘ब्रिट्टा गेस्टहाऊस’ म्हणून ओळखली जाते. पूर्वी येथे निवृत्तीधारकांसाठी होम होते. आता येथे चेक-इन, नाश्ता आणि रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध आहे. १९३० ते १९५० या कालखंडातील ‘ग्रँडमा-चिक’ शैलीत सजवलेले इंटीरियर आधुनिक ट्रीरूम्सपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देते.
आपल्या वेगळेपणामुळे आणि उत्कृष्ट सेवेमुळे या हॉटेलला Tripadvisor कडून ‘ट्रॅव्हलर्स चॉइस बेस्ट ऑफ द बेस्ट 2025’ या यादीत स्थान मिळाले आहे. हा सन्मान जगभरातील अव्वल १% हॉटेल्सनाच दिला जातो.
निसर्ग, शांतता आणि आधुनिक लक्झरी यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल, तर स्वीडनमधील हे ट्री हॉटेल नक्कीच एक अविस्मरणीय ठिकाण ठरू शकते.

Web Title: Worlds most unique luxury treehouses of swiden travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • hotel
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
1

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
2

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
3

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.