दक्षिण भारताच्या हृदयाहृदयावर कोरलेला चेहरा 'क्रीती शेट्टी' तिच्या अदांनी फक्त दक्षिण भारत नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुणांच्या हृदयावर तिच्या सौंदर्याचा हल्ला करत आहे. या हल्ल्याने फक्त भारतातील तरुण नाही तर जगभरातील कित्येक तरुण घायाळ झाले आहेत. क्रीती शेट्टीने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याचा अणुबॉम्ब टाकला आहे.
क्रिती शेट्टीचा हा नवा Photoshoot पाहिला का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री क्रीती शेट्टीने तिच्या @krithi.shetty_official या सोशल मीडियावर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या माध्यमातून तिने नवीन फोटोशूट शेअर केला आहे.
या छायाचित्रांमध्ये क्रिती शेट्टीने लाल रंगाचा आउटफीट परिधान केला आहे. गळ्यात सुंदर नेकलेस, कानात Earrings आणि कपाळावर बारीकशी बिंदी असा हा कीर्तीचा साज शृंगार आहे.
अभिनेत्रींच्या या सुंदर आकर्षक सौंदर्याने तरुणांना भरभरून कौतुक करण्यास भाग पाडले आहे. जणू काही कौतुकाचे वादळच कॉमेंट्स सेक्शनमध्ये आले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये क्रितीने "रेडी आहात पुढच्या प्रवासासाठी ❤️😉 #ARM साठी मिळालेल्या या सन्मानाबद्दल @behindwoodsofficial चे मनःपूर्वक आभार! माझ्या मल्याळम पदार्पणासाठी हा खास क्षण आहे. #ARM टीमला आणि त्या अद्भुत प्रेक्षकांना धन्यवाद, ज्यांनी ही अनुभूती माझ्यासाठी अविस्मरणीय आणि सकारात्मक बनवली ❤️❤️❤️" असे नमूद केले आहे.
तसेच कॅप्शनमध्ये या संपूर्ण Photoshoot बद्दल माहिती पुरवण्यात आली आहे. लाल रंगाचा सुंदर आऊटफिट @ridhimehraofficial यांनी डिजाईन केला आहे.