TVS Apache RR 310's Historic Italian Racing Debut (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय मोटरस्पोर्टसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. टीव्हीएस अपाचे RR 310 (TVS Apache RR 310) आधारित TVS Racing International Championship (TRIC) पहिल्यांदाच युरोपमध्ये पोहोचली आहे. इटलीतील प्रसिद्ध Misano World Circuit Marco Simoncelli येथे या स्पर्धेची फेरी पार पडली. विशेष म्हणजे, भारतीय रेसिंग बाईकने आंतरराष्ट्रीय रायडर्ससोबत स्पर्धा करत जागतिक मोटरस्पोर्टमध्ये भारताची ताकद दाखवून दिली.
टीव्हीएसने याआधी 2020 मध्ये TVS One Make Asia Championship सुरू केली होती. आता याच स्पर्धेचे नाव बदलून TVS Racing International Championship करण्यात आले आहे. ही स्पर्धा आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिपचा भाग म्हणून सुरू असतानाच कंपनीने युरोपमध्येही रेस आयोजित करण्याचे पाऊल उचलले. मिसानो येथे ही फेरी इटलीच्या Coppa Italia National Championship च्या रेस वीकेंडमध्ये पार पडली.
या स्पर्धेत स्पेन, इटली, पोर्तुगाल, कोलंबिया, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण कोरियासह वेगवेगळ्या देशांतील 14 रायडर्स सहभागी झाले होते. भारताकडून सार्थक चव्हाण, चिरंथ विश्वनाथ आणि रक्षित डेव्ह यांनी सहभाग घेतला. चिरंथने जपानमधील मोटेगी फेरीत विजय मिळवल्यानंतर मिसानोमध्ये पाचव्या क्रमांकावर क्वालिफाय केले. क्वालिफायिंगदरम्यान अपघात झाल्यामुळे सार्थकला दोन्ही रेस शेवटच्या स्थानावरून सुरू कराव्या लागल्या.
दोन्ही रेसमध्ये स्थानिक रायडर क्रिस्टियन बोरेलीने विजय मिळवला. पण भारतीय रायडर्समध्ये सार्थक चव्हाणने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने पहिल्या रेसमध्ये सातवे आणि दुसऱ्या रेसमध्ये सहावे स्थान मिळवले. चिरंथने अनुक्रमे 10वे आणि 8वे स्थान मिळवले, तर रक्षित डेव्हने 11वे आणि 12वे स्थान मिळवले. टीव्हीएसच्या बाईकने Aprilia RS 457 च्या वन-मेक रेसिंग बाईकपेक्षा जवळपास 3 सेकंद स्पीड लॅप टाइम नोंदवला. Yamaha R7 च्या वेळेशीही तिची स्पर्धा होती.
TVS Apache RTR 125 EICMA 2026 मध्ये सादर! 15 PS पॉवर, 6-स्पीड गिअरबॉक्स आणि TFT डिस्प्ले
या रेस बाईकचे स्पेसिफिकेशनही खास आहे. कार्बन फायबर बॉडीवर्क, कार्बन रिअर सबफ्रेम आणि फोर्ज्ड व्हील्समुळे फ्युलसह वजन 125 किलोपेक्षा कमी आहे. RR 310 मधील 312.2cc इंजिनमध्ये मोठे बदल करून त्याची पॉवर जवळपास 50 hp पर्यंत नेण्यात आली आहे. इंजिन 12,000 rpm पेक्षा जास्त वेगाने फिरते. याआधी या बाईकने 216 किमी प्रतितास टॉप स्पीड गाठला होता. मिसानो रेसमध्ये नोंदवलेला सर्वोच्च वेग जवळपास 190 किमी प्रतितास होता.
या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय पत्रकारांनाही याच रेस बाईकवर मिसानो ट्रॅकवर राइड करण्याची संधी मिळाली. त्यामुळे भारतीय रेसिंग बाईकला युरोपियन सर्किटवर स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणखी एक चान्स मिळाला. टीव्हीएससाठी हा केवळ एक रेसिंग इव्हेंट नसून भारतीय मोटरस्पोर्टच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
Ans: ही स्पर्धा इटलीतील Misano World Circuit Marco Simoncelli येथे पार पडली. या स्पर्धेची ही पहिली युरोपियन फेरी होती.
Ans: भारताकडून सार्थक चव्हाण, चिरंथ विश्वनाथ आणि रक्षित डेव्ह यांनी सहभाग घेतला. सार्थकने पहिल्या रेसमध्ये सातवे आणि दुसऱ्या रेसमध्ये सहावे स्थान मिळवले.
Ans: या रेस बाईकमध्ये 312.2cc इंजिन देण्यात आले असून, त्यातून जवळपास 50 hp पॉवर मिळते. कार्बन फायबर बॉडीवर्क आणि फोर्ज्ड व्हील्समुळे फ्युलसह बाईकचे वजन 125 किलोपेक्षा कमी आहे.






