Shirpur Turmeric Crop Damage
एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
शिरपूर आणि परिसरात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसारखी पिके घेतली जातात. त्यासोबतच हळद हे मसाला वर्गीय पीकही घेतले जाते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.
काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे पीकही आले नाही. तुरीच्या पिकालाही मोठा फटका बसला असून, उत्पादनाची आशा मावळली आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त हळद पिकावर होती. मात्र, पाण्याअभावी हे पीकही अडचणीत आले आहे. पिकाला आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने वाढ खुंटण्याची भीती आहे. उर्वरित हंगामात पाण्याची उपलब्धता कायम राहील की नाही, याचीही शेतकऱ्यांना खात्री नाही. त्यामुळे हमखास उत्पन्न देणारे मानले जाणारे हळद पीकही यंदा अपेक्षित आर्थिक आधार देईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे पाण्याची उपलब्धता नसल्याने रब्बी हंगामातील पिकाची लागवड आणि पेरणीही होऊ शकलेली नाही, त्यामुळे आगामी हंगामातून उत्पन्न मिळण्याची आशाही धूसर झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान, हळदीवरील संकट आणि रब्बी हंगामाची रखडलेली पेरणी अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. कमी पावसाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाच्या तुटवड्याने शिरपूर परिसरातील शेतीचे अर्थकारणच कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ans: सोयाबीन आणि तूर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आता हळद पिकावरही संकट आहे.
Ans: पाण्याची कमतरता असल्याने हळद पिकाची वाढ खुंटण्याची भीती आहे.
Ans: पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे रब्बी पिकांची पेरणी होऊ शकलेली नाही.






