वरून गुलाबी आणि आतमधून सफेद असलेले ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी गुणकारी आहे. ड्रॅगन फ्रुट खाल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, हे जाऊन घेऊया.
ड्रॅगन फ्रुट खाल्याने आरोग्याला होणारे फायदे
ड्रॅगन फ्रुट हे फळ दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळते. जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जात आहे.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम हे फळ करते. हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींना रोजच्या आहारात या फळाचा आवश्यक समावेश करावा.
पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर किवी आणि ड्रॅगन फ्रुटचा आहारात समावेश केल्यानंतर पांढऱ्या पेशी वाढू लागतात.
ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी असल्याने त्वचेसाठी हे फळ प्रभावी आहे. विटामीन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते.
ड्रॅगन फ्रुटपासून अनेक वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये ज्युस,सॅलड, पुडिंग इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो.