अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठाम आवाज उठवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आरोप केला की, हा कायदा लोकशाही विरोधी असून नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे. सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठीच हा कायदा आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी तालुका आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते. आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत विधेयक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी जोरदार घोषणाबाजीसह केली.