भुतिया गाव! जिथे कोणीही राहत नाही, 200 वर्षांपूर्वी गायब झाली होती लोकं; काय आहे रहस्यमयी कथा?
हे गाव एकेकाळी पालीवाल ब्राह्मणांचे एक समृद्ध गाव होते, जे त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखले जायचे. आम्ही ज्या गावाविषयी बोलत आहोत ते म्हणजे जयपूरमध्ये वसलेले कुलधारा गाव. या गावबाबत अनेक रहस्यमयी कथा प्रचलित आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी कुलधारा आणि आसपासच्या गावांची संपूर्ण लोकसंख्या एका रात्रीत गायब झाल्याचे सांगितले जाते
याच्या कथेबद्दल बोलणे केले तर असे म्हटले जाते की स्थानिक शासक, सलीम सिंग ज्याला पालीवाल ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न करायचे होते मात्र जेव्हा ग्रामस्थांनी त्याची मागणी धुडकावून लावली तेव्हा त्याने गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली
पण गावकरी त्याच्या पुढे झुकले नाही. असे म्हणतात की जाण्यापूर्वी त्यांनी या भूमीला पुन्हा कोणीही येथे स्थायिक होऊ नये असा शाप दिला आणि आजपर्यंत कुलधारामध्ये कोणीही स्थायिक झाले नाही
हे निर्जन गाव आजही जसेच्या तसे मूळ जागेवर उभे आहे मात्र इथे एकही व्यक्ती राहत नाही. इथली शांतता या जागेला आणखीनच रहस्यमयी बनवते. इथे माणसंच काय तर कोणते प्राणी अथवा वनस्पतीही वास्तव करत नाहीत, असते ती फक्त खोल शांतता
कुलधराच्या हरवलेल्या गावकऱ्यांचे आत्मे आजही तिथल्या निर्जन रस्त्यावर फिरत आहेत, अशी अनेकांची धारणा आहे. काही अभ्यागतांनी रात्रीच्या वेळी रहस्यमय सावल्या पाहिल्या किंवा विचित्र आवाज ऐकल्याचा दावा केला आहे
मुख्य गावाची इतकी धोकादायक प्रतिमा असूनही, कुलधारा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. इतिहासप्रेमींना इथली संरक्षित वास्तुकला आवडते, तर रोमांच शोधणारे येथे काहीतरी अलौकिक अनुभवण्याच्या आशेने येतात