'या' तेलांचा वापर केल्यास नखांची होईल झपाट्याने वाढ! दिसतील सुंदर आणि मजबूत नख
जोजोबा तेलाच्या वापरामुळे नखांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि नख मजबूत होतात. हे तेल नखे आणि क्यूटिकल्समध्ये खोलवर जाते, ज्यामुळे नखांची त्वचा मॉइश्चरायझ होते आणि नख वाढतात.
मागील अनेक वर्षांपासून खोबऱ्याच्या तेलाचा वापर त्वचा, केस आणि संपूर्ण आरोग्यासाठी केला जात आहे. या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात.
ऑलिव्ह ऑइलमध्ये विटामिन ई मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे नखांच्या मुळांना खोलवर पोषण मिळते आणि नखांची वाढ होते.
नखांवरील बुरशीजन्य संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी चहाच्या तेलाचा वापर करावा. या तेलात असलेले गुणधर्म बुरशीपासून नखांचा बचाव करतात.
बदाम तेलात विटामिन ई, झिंक आणि प्रथिने इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे नखांची ताकद आणि चमक कायम टिकून राहते.