२०२५ मध्ये भारतात सर्वात जास्त गुगलवर सर्च करण्यात आले होते 'हे' चविष्ट पदार्थ
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. त्यातीलआवडीचा पदार्थ म्हणजे इडली. यंदाच्या वर्षी गुगलवर इडली हा पदार्थ शोधण्यात आला होता.
गुगलवर शोधण्यात आलेला दुसरा पदार्थ म्हणजे पॉर्न स्टार मार्टिनी कॉकटेल. हा पदार्थ पॅशन फ्रुट, व्हॅनिला आणि वोडका इत्यादी पदार्थांपासून बनवला जातो.
महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवले जातात. यामध्ये गूळ आणि ओल्या खोबऱ्याचा सारण भरला जातो.
उत्तर भारतातील प्रसिद्ध पेय म्हणून बीटरूट कांजीची ओळख आहे. बीटचा रस तयार करून उन्हात दोन ते तीन दिवस ठेवला जातो. त्यानंतर कांजी तयार होते. कांजी पेय प्यायल्यास शरीरात थंडावा टिकून राहतो.
उन्हाळाच्या दिवसांमध्ये गोंद कातिराचे सरबत बनवून प्यायले जाते. या पेयाच्या सेवनामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच शरीरात थंडावा टिकून राहतो.