फोटो सौजन्य - pinterest
कर्जबाजारी देशांच्या यादीतील पहिलं नाव ऐकूण नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. अमेरिका हा देश सर्वात जास्त कर्ज असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेवर एकूण 33,229 अब्ज डॉलर अर्थात 27 कोटी 73 लाख 858 कोटी रुपये कर्ज आहे.
14692 अब्ज डॉलर्स कर्जासह चीन दुसऱ्या स्थानी आणि 10,797 अब्ज डॉलर कर्जासह जपान तिसऱ्यास्थानी आहे.
चौथ्या क्रमांकावर युनायटेड किंग्डम हा देश आहे. ज्यावर कर्ज त्याच्या जीडीपीच्या 142 टक्के आहे. म्हणजेच युनायटेड किंग्डम 3,469 अब्ज डॉलर कर्जासह या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे.
या यादीत 3354 अब्ज डॉलर्स कर्जासह फ्रान्स पाचव्या स्थानी आणि 3,141 अब्ज डॉलर कर्जासह इटली सहाव्या स्थानी आहे.
वर्ल्डस ऑफ स्टॅटिटिक्सच्या आकडेवारीनुसार, सर्वात जास्त कर्ज असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. भारतावर एकूण 3057 अब्ज डॉलरचे अर्थात 2,55,189 कोटी रुपये कर्ज आहे. जे देशाच्या GDP च्या 46 टक्के आहे.
या यादीत जर्मनी आठव्या स्थानी आहे. जर्मनीवर 2,919 अब्ज डॉलर कर्ज आहे. 2,253 अब्ज डॉलर कर्जासह कॅनडा नवव्या स्थानी आणि ब्राझील दहाव्या स्थानी आहे.