भारतातील या राज्यात आढळतात 80 टक्क्यांहून अधिक शाकाहारी लोकं! नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क
भारत जगातील अशा देशांमध्ये समाविष्ट आहे, जिथे सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात. भारतात असे देखील काही राज्य आहेत जिथे 99 टक्के लोकं मासांहारी आहेत. म्हणजेच भारतात शाकाहारी आणि मासांहारी असे दोन्ही प्रकारचे लोकं राहतात.
पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोकं राहतात? भारतातील हे राज्य शाकाहारात नंबर वन मानले जाते.
देशातील सर्वात जास्त शाकाहारी लोकसंख्या राजस्थानमध्ये आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील सुमारे 74.9 टक्के लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत.
येथील लोकं प्रामुख्याने डाळ, रोटी, भात, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा त्यांच्या जेवणात समावेश करतात.
दुसरीकडे, नागालँड हे देशातील असे राज्य आहे जिथे शाकाहारी लोकांची संख्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. येथील 99 टक्क्यांहून अधिक लोक मांसाहारी आहेत.