शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या 'या' पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित
बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे काही निवडक आरोग्य समस्या या जवळजवळ सर्वांनाच भेडसवू लागल्या आहेत. यातीलच एक हानिकारक आणि घातक ठरणारी आरोग्य समस्या म्हणजे कर्करोग. हा एक गंभीर आजार असून यात शरीराच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात. हा आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात पण बहुतेकवेळी आपली जीवनशैली आणि आहार याचे मोठे कारण असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे की, आपल्या रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांमुळे शरीरात कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढत असतो. अशात हे पदार्थ खाणे टाळणे जास्त फायद्याचे ठरेल. चला तर मग या कर्करोगाला कारणाभूत ठरणाऱ्या पदार्थांची यादि जाणून घेऊया.
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण
प्रक्रिया केलेले मांस
WHO ने सांगितले की, प्रक्रिया करुन तयार केलेले मांस जसे की, हॉट डॉग, सलामी, सॉसेज आपल्या शरीरात हानिकारक कर्करोग निर्माण करण्याचे काम करते. प्रक्रिया करुन तयार केलेले हे मांस जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलन कर्करोग, पोट कर्करोग आणि स्तन कर्करोगाचा धोका जास्त पटीने वाढतो. तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश होत असेल तर याचे सेवन आजपासूनच टाळा
तळलेले पदार्थ
आपल्याला सर्वांनाच तळलेले पदार्थ जसे की, भजी, फ्रेंच फ्राईज खायला प्रचंड आवडतात. बटाट्यांसारखे पिष्टमय पदार्थ जेव्हा जास्त तापमानात तापनले जातात तेव्हा त्यातून अॅक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर पडते जे संयुगात डीएनए खराब करण्याची आणि पेशी नष्ट करण्याचे काम करते. संशोधनात असे आढळून आले आहे की, डीप फ्राय केलेले पदार्थ हे फक्त कर्करोगाचा धोका वाढवत नाहीत तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांना देखील खुलं आमंत्रण देतात.
अल्कोहोल
अल्कहोलचे सेवन आपल्यासाठी किती घातक आहे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहेच. याचे नियमित सेवन शरीरात एसीटाल्डिहाइड नावाचे रसायन तयार करते, जे डीएनएला नुकसान पोहचवते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते आणि शरीरात कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींशी लढण्याची क्षमता कमी होते. अल्कोलचे सेवन विशेषत: महिलांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी वाढवते ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त लक्षणीयरित्या वाढते. नियमित अल्कोलचे सेवन करणाऱ्या लोकांना विविध प्रकारचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.
दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यदायी मानले जातात पण संशोधनात असे समोर आले आहे की, जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने प्रोस्टेट कँसरचा धोका वाढू शकतो. दुग्धजन्य पदार्थ IGF-1 (इंसुलिनसारखे वाढ घटक) चे प्रमाण वाढवते. दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन कर्करोगाच्या पेशींची संख्या वाढवण्यास गती मिळवून देते. अशात दुग्धजन्य पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरु शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.