शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा 'या' फळांचा समावेश
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध असतात. लाल, काळी आणि हिरव्या रंगाची द्राक्ष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात तुम्ही द्राक्ष खाऊ शकता.
किमतीने महाग असलेले किवी हे फळ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. शरीरातील कमी झालेल्या पांढऱ्या पेशी पुन्हा वाढण्यासाठी आहारात किवीचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते, तसेच त्वचेच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर डाळिंबाचे सेवन करावे. डाळिंब खाल्यामुळे शरीरात रक्त वाढते. तसेच आजारपणामुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन करावे.
शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारामध्ये केळ्यांचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि थकवा, अशक्तपणाच्या समस्येपासून आराम मिळतो. केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक आढळून येतात.
डॉक्टरकडे गेल्यानंतर ते नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्यामुळे माणूस आजारांनापासून दूर राहतो आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यामध्ये फायबर, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक आढळून येतात.