शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा 'या' स्मूदीचा समावेश
संत्र, गाजर, नारळाचे पाणी आणि आल्याचा वापर करून बनवलेली स्मूदी आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहे. या स्मूदीच्या सेवनामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसू लागेल. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात.
हिवाळ्यामध्ये बाजारात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरीचा वापर करून स्मूदी बनवू शकता. या स्मूदीचे नाश्त्यात सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.
स्मूदी बनवताना खजूर, अक्रोड, बदाम इत्यादी पदार्थांचा वापर केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. कारण यामध्ये भरपूर फायबर, लोह आणि निरोगी चरबी युक्त घटक आढळून येतात.
बदाम, केळी खाल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय स्मूदीचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. स्मूदी हा झटपट तयार होतो.
लहान मुलांसह मोठ्यांना चॉकलेट हा पदार्थ खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात चॉकलेट स्मूदी बनवून शकता. चॉकलेट स्मूदी प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.