प्री-डायबिटीजमुळे मधुमेह होऊ देऊ नका
तुमचे शरीर मधुमेह होण्याबाबत संकेत देत असेल आणि तुम्हाला त्याबाबत जाणीव सुद्धा नसेल तर? असेच काहीतरी प्रीडायबिटीजच्या बाबतीत घडते. शहरी व ग्रामीण भागांमधील जवळपास १५.३ टक्के व्यक्ती या आरोग्यसंबंधित आजाराने पीडित आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मते, भारतात जवळपास १०१ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह असण्याचा अंदाज आहे, जेथे २०१९ मधील ७० दशलक्ष व्यक्तींच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. रक्तातील साखरेची पातळी काहीसी वाढलेली असते, पण मधुमेह होण्याइतकी नसते तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबिटीज म्हणतात. हा आजार सहसा शांतपणे आणि कोणतीही लक्षणे दिसून न येता वाढत जातो, ज्यामुळे अनेक व्यक्तींना त्याबाबत जाणीव देखील होत नाही. योग्य माहिती आणि जीवनशैलीमध्ये काहीशा बदलांसह या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे.(फोटो सौजन्य – istock)
वर्षानुवर्षे प्रीडायबिटीजकडे दुर्लक्ष होऊ शकते. थकवा, वजनातील बदल किंवा वारंवार तहान लागणे यांसारख्या सूक्ष्म लक्षणांकडे बहुतेक वेळा दैनंदिन जीवनातील तणावाचा भाग म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण योग्य वेळी लक्ष न दिल्यास प्रीडायबिटीजमुळे टाइप २ मधुमेह होऊ शकतो आणि हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार व इतर गुंतागूंतींचा धोका वाढू शकतो.
प्रीडायबिटीज बहुतेकदा लक्षात येत नाही, कारण त्यात क्वचितच स्पष्ट लक्षणे दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळेवर, व्यावहारिक बदल जसे संतुलित पोषण, सक्रिय राहणे आणि तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून विचारपूर्वक जीवनशैली निवडणे यासह व्यक्ती टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकतात. यासंदर्भात मोठे बदल करण्याची गरज नाही, तर सातत्यता, शाश्वत आरोग्यदायी सवयी अंगिकारल्या पाहिजेत, ज्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे आरोग्य उत्तम राहिल,” असे अॅबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेसच्या मेडिकल अँड सायण्टिफिक अफेअर्सच्या संचालिका डॉ. प्रीती ठाकोर म्हणाल्या.
बहुतेकदा बालपण किंवा पौगंडावस्थेत दिसून येणऱ्या टाइप १ मधुमेहाच्या तुलनेत प्रीडायबिटीज आणि टाइप २ मधुमेह हळूहळू विकसित होतो. प्रीडायबिटीज असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये बहुतेकदा मधुमेहाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसून येत नाहीत, पण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. काही लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
थकवा: पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवणे, ज्यामुळे शरीर उर्जेसाठी ग्लुकोजचा कार्यक्षमतेने वापर करत नाही.
अस्पष्ट वजन बदल: शरीराच्या ग्लुकोज प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे काही व्यक्तींना अनपेक्षित वजन वाढणे किंवा कमी होणे जाणवू शकते.हळू बरे होणाऱ्या जखमा: रक्तातील सामान्यपेक्षा जास्त साखरेची पातळी रक्तप्रवाह आणि रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करू शकते.
लवकर निदान आणि जीवनशैलीत बदल केल्यास टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
प्रीडायबिटीजच्या विकासात आणि प्रतिबंधात आहाराची भूमिका:
आहारसंबंधित सवयी प्रीडायबिटीज वाढतो की नियंत्रणात येतो यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. रिफाइंड साखर, संतृप्त फॅट्स आणि अधिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ असलेल्या आहाराच्या सेवनामुळे शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ शकते, ज्यामुळे कालांतराने रक्तातील साखरेची पातळी वाढते.
पण, चांगली बातमी आहे? लक्ष्यित आहारातील बदलांसह जीवनशैलीतील बदल टाइप २ मधुमेह होण्याला प्रतिबंध किंवा विलंब करू शकतात. संतुलित, संपूर्ण अन्न-आधारित आहार ग्लुकोज व्यवस्थापनास साह्य करतो, चयापचय वाढवतो आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतो.
प्रीडायबिटीजसह निदान झाले असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन पुढे देण्यात आले आहे:
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ निवडा: संपूर्ण धान्य, शेंगा, स्टार्च नसलेल्या भाज्या आणि सफरचंद किंवा पेअर सारखी फळे सेवन करा. हे रक्तप्रवाहात हळूहळू ग्लुकोज सोडण्यास मदत करतात.
फायबरचे सेवन वाढवा: इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी दररोज २५-३० ग्रॅम भाज्या, साल असलेली फळे, संपूर्ण धान्ये आणि बियांचे सेवन करा.
लीन प्रोटीन व आरोग्यदायी फॅट्स समाविष्ट करा: मसूर, अंडी, टोफू, मासे, काजू व अॅवोकॅडो भूकेचे शमन करण्यास आणि उर्जेची पातळी स्थिर करण्यास मदत करतात.
साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स कमी करा: सॉफ्ट ड्रिंक्स (शीतपेये), मिठाई आणि व्हाइट ब्रेडऐवजी आरोग्यदायी व फायबरयुक्त पर्यायांना प्राधान्य द्या.
सेवनावर नियंत्रण इेवा: पौष्टिक अन्न देखील जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. योग्य प्रमाणात सेवन करा, पॅकेट्सवरील लेबल वाचा आणि एकाच वेळी दोनदा आहार सेवन करणे टाळा.
संतुलित आहाराचे सेवन उत्तम आहे, पण आधुनिक काळातील जीवनशैलीमध्ये ते सहजपणे मिळणे शक्य नाही. डायबिटीज-स्पेसिफिक न्यूट्रिशन (डीएसएन) उत्पादने ही कमतरता भरून काढण्यात मदत करू शकतात. ही उत्पादने आवश्यक प्रमाणात मोठे (मॅक्रो) व सूक्ष्म (मायक्रो) पोषक घटक देतात, तसेच रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवतात.
प्रीडायबिटीजचे व्यवस्थापन रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासह एकूण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, उत्तम पोषणासह जीवनशैलींमध्ये बदल आणि नियमित व्यायाम करणाऱ्या प्रीडायबिटीज असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होऊ शकते आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
काही पण सातत्यपूर्ण सवयी जसे आरोग्यदायी आहाराचे सेवन, दिवसातून किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम आणि नियमितपणे तपासणी यामुळे बदल घडून येऊ शकतो. मधुमेहाचे व्यवस्थापन करताना सुरूवातीपासून उत्तम व्यवस्थापन आवश्यक आहे आणि याची सुरूवात आरोग्यदायी आहार व योग्य जीवनशैलीसह होते.