पचनसंस्था कायमच राहील निरोगी! 'हे' सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका
कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. पचनक्रिया निरोगी असल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. तुमच्या शरीराची पचनक्रिया जर निरोगी असेल तर तुम्ही आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून कायमच दूर राहाल. दिवसभरात खाल्लेल्या पदार्थांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या आणि कमी तिखट, तेलकट पदार्थांचे सेवन करावे. पोटाचे आरोग्य बिघडल्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडू लागते. त्यामुळे शरीराची पचनसंस्था आणि पचनक्रिया कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीराला हानी पोहचते. चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराच्या पचनक्रियेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो.(फोटो सौजन्य – istock)
आहारात खाल्ले जाणारे तिखट आणि तेलकट पदार्थ, अपुरी झोप इत्यादींमुळे शरीरात पित्त वाढते. शरीरात पित्त वाढल्यानंतर विषारी घटक तसेच साचून राहतात. ज्यामुळे पोट दुखणे, पोट फुगणे, गॅस, अपचन आणि ऍसिडिटी होऊन शरीराला हानी पोहचते. पचनक्रिया बिघडल्यानंतर अनेक लोक सतत दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेले काही गोल्डन रुल्स सांगणार आहोत. हे रुल्स फॉलो करून तुम्ही कायमच निरोगी आणि पोटाच्या विकारांपासून दूर राहू शकता.
आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार,आहारात केवळ पौष्टिक पदार्थांचा समावेश न करता योग्य पद्धतीने जेवणे अतिशय महत्वाचे आहे. जेवणाची योग्य पद्धत पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची ठरते. नेहमीची शांतपणे जेवण जेवणे आवश्यक आहे. पचनक्रियेवर तणाव येईल अशा गोष्टी करणे टाळावे. जेवणताना मनात कोणताही राग, भीती किंवा तणाव ठेवून जेवल्यास थेट पचनक्रियेवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे जेवणाच्या ताटात वाढलेले पदार्थ कायमच आनंदाने खावेत. अन्नपदार्थाचा प्रत्येक घास अतिशय शिस्तीने आणि योग्य पद्धतीने चावून खाणे गजरेचे आहे.
आयुर्वेदामध्ये, पाण्याला विशेष महत्व आहे. नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते आणि विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय अनेक लोक जेवताना अजिबात पाण्याचे सेवन करत नाही. पण पाण्याचे जेवणताना सेवन केल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. त्यामुळे जेवताना थोडं थोडं पाणी प्यावे. कमी पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रियेत अडथळे येण्याची जास्त शक्यता असते. जेवण झाल्यावर ४० ते ४५ मिनिटांनी भरपूर पाण्याचे सेवन करावे.
अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
आयुर्वेदात सांगितल्यानुसार, नेहमीच ताजे आणि पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करावे. शरीराला सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य कायमच निरोगी राहील. आहारात फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
आतड्याचे आरोग्य म्हणजे काय?
आतड्याचे आरोग्य म्हणजे तुमच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांचे संतुलन आणि कार्य. तुमच्या आतड्यात असलेले बॅक्टेरिया, बुरशी आणि विषाणू (तुमचे आतड्याचे मायक्रोबायोम) अन्न पचनात, पोषक तत्वे शोषून घेण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यात मदत करतात.
चांगले आतड्याचे आरोग्य का महत्वाचे आहे?
चांगले आतड्याचे आरोग्य तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. ते पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, मानसिक आरोग्य सुधारते आणि अनेक आजारांपासून संरक्षण करते.
आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?
आहार: फायबर समृद्ध अन्न, फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रोबायोटिक्स (आंबवलेले अन्न) आहारात घ्या. प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.