भारताचा संघ तिसऱ्या सामान्यसाठी मुंबई करतोय सराव - फोटो सौजन्य - BCCI
भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खाली दुसऱ्यांदा भारताच्या संघाने विश्वचषकानंतर मालिका गमावली आहे. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. फोटो सौजन्य - BCCI
भारताच्या फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर नजरा असणार आहे. त्याचबरोबर आकाशदीप आणि अक्षर पटेलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI
रिषभ पंत आणि सरफराज खान याच्या फलंदाजीवर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहे. दोन्ही फलंदाजांनी मागील सामन्यात कमालीची कामगिरी केली होती परंतु टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नाही. फोटो सौजन्य - BCCI
केएल राहुलने भारतीय संघामध्ये बऱ्याच काळानंतर संघामध्ये पुनरागमन केले आहे परंतु तो चाहत्यांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे. फोटो सौजन्य - BCCI
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मागील सामन्यांमध्ये फार काही चांगली कमगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याला विश्रांती देऊन कोणत्या खेळाडूला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये फार मोठी काही कामगिरी करू शकला नाही. त्याच्या हाती एकही विकेट लागली नाही. फोटो सौजन्य - BCCI