भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन! इथून दिसतात दुसऱ्या देशाचे दृश्य
भारतातील शेवटच्या रेल्वे स्थानकाचे नाव सिंहाबाद असे आहे. हे रेल्वे स्टेशन बांगलादेशाचा अगदी जवळ आहे. येथे रेल्वेचा वापर मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो
सिंगाबाद हे पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात येते. या स्थानकावरून तुम्हाला बांगलादेशची सीमा पाहायला मिळते. या रेल्वे स्थानकावर लोक पायी जाऊ शकतात
सिंहाबादच्या पलीकडे भारतीय रेल्वेची कोणतीही स्थानक नाहीत. हे स्टेशन फार जुने असल्यामुळे येथे फार लोक दिसत नाहीत. येथून अधिकतर मालगाड्या धावतात
हे रेल्वे स्टेशन ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आले. हे स्टेशन बराच काळ निर्जन होते. 1978 पासून येथून येथून मालगाड्यांची वाहतूक सुरु झाली. त्याकाळात येथून बांग्लादेशात मालगाड्या जात होत्या
तेव्हापासून ते आतापर्यंत या रेल्वे स्थानकात काहीही बदल झालेला नाही. आता या रेल्वे स्थानकावरून बांगलादेश आणि नेपाळमध्ये ट्रेन जातात