जगभरात असंख्य लोक कायमच मद्यपान, दारू, बिअर इत्यादी अनेक ड्रिंकचे सेवन करतात. पार्टी असो वा कोणत्याही कार्यक्रमात कायमच वाईन प्यायली जाते. वाईन प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. रोड वाईनचा एक ग्लास प्यायल्यास हृदयाच्या आजारांपासून कायमची सुटका मिळते, असे दावा अनेक लोक करतात. चला तर जाणून घेऊया वाईन प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

रेड वाईन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. पण योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. वाईनमध्ये रेस्वेराट्रोल नावाचे एक अँटीऑक्सिडेंट आढळून येते.

रेड वाईन प्यायल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पण सतत मद्यपान केल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. अति प्रमाणात वाईन प्यायल्यामुळे रक्तदाब, हृदयाची धडधड, लठ्ठपणा इत्यादी गंभीर आजार होऊ शकतात.

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कायमच वाईन किंवा बिअर पिण्याची आवश्यकता नाही. इतर गोष्टी करून हृदयाची काळजी घेऊ शकता.

रेड वाईन प्यायल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य मदत होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आतडे, मेंदू आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

शरीरात वाढलेली उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाईन पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आतड्यांमधील फायदेशीर बॅक्टेरियाची पातळी सुधारते






