गोड पान खाण्याचे फायदे
ज्या व्यक्तींना अपचन किंवा असिडिटीचा त्रास होत असेल अशांनी जेवल्यानंतर पान खावे. पान खाल्यामुळे असिडिटीचा त्रास होत नाही. तसेच गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
दातांच्या हिरड्या मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात जेवल्यानंतर पान खावे. दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि त्यातून रक्त बाहेर येणे इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे खोकला किंवा सर्दी होते. अशावेळी तुम्ही विद्याचा पान चावून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कफ किंवा सर्दी, खोकला होणार नाही.
दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी पान चावून खावे. पान चावून खाल्ल्यास दातांवरील पिवळा थर कमी होऊन दात पांढरे शुभ्र दिसतील.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.