मुकेश मिल्स मुंबईतील एक कुप्रसिद्ध हॉरर जागा. (फोटो सौजन्य - Social Media)
१९८२ साली, एका आगीमुळे संपूर्ण मुकेश मिल्स जळून गेली. यामध्ये अनेक कामगार जळून मेले. तेव्हापासून ही जागा अनुभवाने आणि दिसण्याने, दोन्हीही मुद्द्यात भयंकर आणि हॉररच आहे.
या जागेवर अनेक चित्रपट शूट झाले आहेत. अनेक अभिनेत्यांनी येथे अनेक आवाजे ऐकले आहेत. हॉरर अनुभव झाले आहेत.
एका शूटिंग दरम्यान एका अभिनेत्रीला पछाडले गेले होते. येथे दिवसाही जाण्याचे धाडस कुणी करत नाही. शूटिंग असतील तर संध्याकाळ होण्याच्या अगोदर येथून पॅक अप केले जाते.
त्या जागेने १९९० च्या दशकात आणि त्यानंतर बॉलिवूड चित्रपटांसाठी एक लोकप्रिय शूटिंग स्थळ म्हणून प्रसिद्धी मिळवली.
भीतीदायक अनुभव आणि नोंदवलेल्या भुताटकीच्या हालचालींमुळे चित्रपटांच्या टीम्स सूर्यास्तानंतर या जागेत काम करत नाही.