Naga Chaitanya Sobhita Dhulipala Unseen Photos From Wedding Romantic Photos And Marriage Ritual Pic
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा विवाहसोहळा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये थाटामाटात पार पडला. या कपलने पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली असून अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नागा चैतन्य आणि सोभिताने ४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्यांदाच आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी दोघांनीही लग्नामध्ये दाक्षिणात्य लूक परिधान करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.
सोभिताने आयुष्यातल्या या खास सोहळ्यासाठी लाल-पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीच्या साडीवर सोनेरी रंगाचे नक्षीकाम केलेले दिसत आहे. या पारंपारिक साडीत अभिनेत्री पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली होती. शिवाय तिने लग्नातील इतर विधींसाठी सोनेरी रंगाची साडीही नेसली आहे.
तर नागाचैतन्यने या खास सोहळ्यासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोती परिधान केलेला दिसत असून या सेलिब्रिटी कपलच्या लग्नातले विधी तेलुगु ब्राह्मण परंपरेनुसार पार पडले.
लग्नाच्या विधी दरम्यान, अभिनेत्रीवर अक्षतांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत असून या खास सोहळ्या प्रसंगी तिच्या चेहऱ्यावर निखळ आनंद पाहायला मिळतोय. तर काही फोटोंमध्ये ते एकमेकांना वरमालाही घालताना दिसत आहेत.
लग्नामध्ये, नागा चैतन्य आणि सोभिता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. त्यांची नजर एकमेकांवरुन हटत नव्हती. या रोमँटिक फोटोची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
नागा चैतन्यने २०१७ साली अभिनेत्री समांथा रुथ प्रभूसोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर म्हणजेच २०२१ मध्ये त्या दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर काही महिन्यांनी नागा चैतन्य आणि सोभिताच्या अफेअरची चर्चा रंगली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्यानंतर या वर्षाच्या शेवटी धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली.