अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये नीता अंबानी यांनी हजेरी लावली होती. नीता अंबानी त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे भारतासह इतर सर्वच देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये नीता अंबानी यांनी नेसलेल्या साडीची सगळीकडे मोठी चर्चा आहे. चला तर जाणून घेऊया नीता अंबानी यांनी पार्टीमध्ये नेसलेल्या साडीची खास वैशिट्य. (फोटो सौजन्य – instagram)
ट्रम्पच्या डिनर पार्टीमध्ये नीता अंबानीच्या साडीची सगळीकडे चर्चा
नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या साडीची सगळीकडे मोठी चर्चा रंगली आहे. त्यांची साडी सेलिब्रिटी डिझायनर तरुण ताहिलियानी यांच्या कलेक्शनमधील आहे.
जामावार प्रकारातील साडीमध्ये नीता अंबानी अतिशय सुंदर आणि उठावदार दिसत आहेत. या साडीवर त्यांची हिऱ्यांचा नेकल्स परिधान केला आहे.
जामावार हा शब्द पार्शियन भाषेतील असून त्याचा अर्थ फुलांनी सजवलेला कपडा असा होतो. त्यांच्या साडीवर सुंदर फुलांचे नक्षीकाम करण्यात आले आहे.
जामावार ही विणकाम कला काश्मिरची आहे. पण त्यानंतर ती पारशी आणि मध्य आशियातल्या व्यापाऱ्यांकडे गेली. त्यानंतर त्यांनी नीता अंबानी यांच्यासाठी सुंदर साडी तयार केली आहे.
नीता अंबानी यांची साडी तयार करण्यासाठी कारागिरांना १९०० तास म्हणजेच जवळपास ८० दिवस लागले. त्यानंतर अशी सुंदर आणि आकर्षक साडी तयार करण्यात आली आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशनमध्ये तयार करण्यात आलेल्या साडीवर सेक्विन वर्क करण्यात आले आहे.