राशीद खान(फोटो-सोशल मीडिया)
Rashid Khan World Record in T20I : बांगलादेशने अफगाणिस्तानला पहिल्या T20 सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकात 9 विकेट्स गमावून 151 धावा उभ्या केल्या, त्यानंतर बांगलादेशने 6 विकेट्स गमावून हे लक्ष्य सहज गाठले. अफगाणिस्तान सामना गमावला असला तरी, रशीद खानने कर्णधार म्हणून एक विशेष विश्वविक्रम स्थापन केला आहे. रशीद खान कर्णधार म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चार विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. कर्णधार म्हणून रशीद खानचा हा पाचवा टी20I असून जर्सीच्या चार्ल्स पर्चर्डचा विक्रम मोडून तो इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरला आहे.
येथे हे लक्षात घ्यायला हवे की पूर्ण सदस्य देशांच्या कर्णधारांमध्ये, संघाचे नेतृत्व करत असताना कोणीही दोनदापेक्षा जास्त चार विकेट्स घेतलेल्या नाहीत. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन या दोघांनि देखील आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्यांच्या देशाचे नेतृत्व करताना दोन वेळा ही किमया केली आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान हा पर्चर्डनंतर संघाचे नेतृत्व करताना १० वेळा तीन बळी घेणारा आणि पूर्ण सदस्य संघाकडून असा विक्रम करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम
झिम्बाब्वे संघाने मोठी कामगिरी करत २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. झिम्बाब्वेने केनियाचा ७ विकेट्सने पराभव करून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे. झिम्बाब्वेपूर्वी नामिबिया संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश आले होते. झिम्बाब्वेच्या पात्रतेसह, एकूण १७ संघांनी विश्वचषक २०२६ साठी पात्रता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२६ च्या विश्वचषकासाठी फक्त तीन संघ पात्रता मिळवण्यापासून बाकी आहेत. ते आशिया-पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून पात्र ठरणार आहेत. तीन स्थानांसाठी नऊ संघ स्पर्धा करणार आहेत. ८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये आशिया-ईएपी पात्रता स्पर्धा खेळवली जाईल.