डायबिटीस वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने खरं तर वाढते. केवळ गोड पदार्थ खाऊन रक्तातील साखरेची पातळी वाढते असं नाही
जंक फूड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. जंक फूडमध्ये मैदा आणि तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढते
साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ सोडले असतील, पण जर तुम्ही खूप फास्ट फूड खाल्ले तर साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. पॅकेज्ड फूड खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढू शकते
चिप्स आणि खारट चवीला असणारे पदार्थदेखील साखरेची पातळी वाढू शकते. चिप्स आणि खारटमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते
मटरी, बिस्किट्स इत्यादी रिफाइंड पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानेही साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. मधुमेही रुग्णांनी रिफाइंड पिठापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे
केवळ गोड पदार्थच नाही तर विविध खारट, जंक फूड, प्रोसेस्ड फूड, मैदा असणारे पदार्थ यानेही डायिबिटस रूग्णांनी वर्ज्य करावे