Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळेवर औषध घेऊन, गोड पदार्थ टाळूनही शुगर कमी होत नाहीये? मग हे 5 असू शकतात त्यामागील कारणं

गोड न खाल्लं तरी ब्लड शुगर वाढू शकतं. कारणं म्हणजे जास्त कार्बोहायड्रेट्स, उच्च ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ, व्यायामाची कमतरता, ताणतणाव आणि अपुरी झोप. 

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 17, 2025 | 06:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बर्‍याच लोकांना असं वाटतं की ब्लड शुगर वाढण्याचं मुख्य कारण फक्त गोड खाणं आहे. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती गोड पदार्थ, मिठाई किंवा शीतपेय सोडतो आणि तरीही त्याची साखर वाढते, तेव्हा आश्चर्य आणि काळजी वाटते. पण प्रत्यक्षात मधुमेह (Diabetes) नियंत्रणात न राहण्यामागे अनेक वेगवेगळ्या कारणांचा हात असतो. फक्त गोड खाणं टाळून किंवा वेळेवर औषधं घेऊन हा आजार पूर्णपणे कंट्रोल करता येत नाही.

मासिक पाळीतील एकाकीपणा आता संपणार, Period Partner ची गरज का भासते?

चला जाणून घेऊया ब्लड शुगर वाढण्यामागची महत्त्वाची कारणं: 

जास्त कार्बोहायड्रेट्स असलेलं अन्न

फक्त गोड न खाल्ल्याने साखर कमी होईल असं नाही. कारण कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यावर ते ग्लुकोजमध्ये बदलतात. जर तुम्ही रोटी, भात, बटाटे, पास्ता, ब्रेड, नूडल्स किंवा प्रोसेस्ड स्नॅक्स वारंवार खात असाल, तर त्याने रक्तातील साखर पटकन वाढते. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

उच्च ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ

काही पदार्थ गोड नसतानाही रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. त्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स म्हणतात. उदाहरणार्थ – पांढरी ब्रेड, पांढरा भात, बटाटे, टरबूज आणि कॉर्नफ्लेक्स. हे लवकर पचतात आणि शुगर पातळी अचानक वाढवतात. याउलट, डाळी, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये आणि सुका मेवा हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स आहेत, जे हळूहळू पचतात आणि शुगर नियंत्रणात ठेवतात.

शारीरिक हालचालींची कमतरता

व्यायाम न करणं किंवा कमी हालचाल करणं शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतं. इन्सुलिनमुळे शुगर पेशींमध्ये जाऊन उर्जा तयार होते. पण हालचाल कमी केल्याने स्नायूंना कमी उर्जा लागते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता घटते. त्यामुळे शुगर रक्तातच राहते व पातळी वाढते.

ताणतणाव (Stress)

मानसिक ताण आणि ब्लड शुगर यांचा थेट संबंध आहे. ताण आल्यावर शरीरात कोर्टिसोल आणि अॅड्रेनालाईन हे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स शरीराला “फाइट ऑर फ्लाइट” स्थितीत नेतात आणि लिव्हरमधील ग्लुकोज रक्तात सोडला जातो. जर ताण सतत राहिला तर शुगर लेव्हलही सतत वाढलेली राहते.

रात्रीच्या जेवणाला बनवा बिर्याणीचा बेत, पण नेहमीची चिकन नाही तर यावेळी ट्राय करा मसालेदार ‘अंडा बिर्याणी’

झोप पूर्ण न होणे

नीट झोप न लागणं किंवा कमी झोप घेणं हेही शुगर वाढण्याचं कारण आहे. झोपेच्या अभावामुळे शरीराची नैसर्गिक सर्केडियन रिदम बिघडते, ज्यामुळे कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. त्याचबरोबर घ्रेलिन आणि लेप्टिन या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचा तोल बिघडतो. त्यामुळे वारंवार जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा गोड खाण्याची इच्छा होते.

फक्त गोड खाणं टाळून ब्लड शुगर नियंत्रित ठेवता येत नाही. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण, खाण्याचे प्रकार, व्यायाम, ताणतणाव आणि झोप यावरही तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि मानसिक संतुलन ठेवल्यास शुगर नियंत्रणात राहू शकते.

Web Title: These could be the 5 reasons of taking medicine on time and avoiding sweet foods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • diabetes

संबंधित बातम्या

मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल
1

मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल

कारलं सोडा, या 5 भाज्याही करतात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी; डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर; कधीही 100 पार जाणार नाही शुगर
2

कारलं सोडा, या 5 भाज्याही करतात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी; डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर; कधीही 100 पार जाणार नाही शुगर

कडू मेथी दाणे शरीरासाठी ठरतील वरदान! रोजच्या आहारात ‘या’ पद्धतीने करा सेवन, कधीच वाढणार नाही कोलेस्ट्रॉल मधुमेहाचा धोका
3

कडू मेथी दाणे शरीरासाठी ठरतील वरदान! रोजच्या आहारात ‘या’ पद्धतीने करा सेवन, कधीच वाढणार नाही कोलेस्ट्रॉल मधुमेहाचा धोका

रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामदेव बाबाने सांगितला घरगुती जुगाड; या फळापासून तयार करा देसी चूर्ण
4

रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामदेव बाबाने सांगितला घरगुती जुगाड; या फळापासून तयार करा देसी चूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.