या भागांवर दिसतात डायबिटीसची लक्षणं (फोटो सौजन्य: iStock)
टाइप 2 डायबिटीसची सुरुवात हळूहळू होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे सौम्य असू शकतात. परिणामी, अनेकांना हा आजार झाल्याचे लक्षात येत नाही. म्हणूनच काही लक्षणांबद्दल तुम्हाला ठाऊक असणे गरजेचे आहे.
वारंवार लघवी होणे: जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते, तेव्हा किडनी रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करून काढून टाकण्याचा प्रयत्न करते. यामुळे एखाद्या व्यक्तीला जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासू शकते, विशेषतः रात्री.
सतत तहान लागणे: रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी वारंवार लघवी केल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी कमी होऊ लागते. यामुळे नेहमीपेक्षा जास्त तहान लागते.
वारंवार भूक लागणे: डायबिटीस असलेल्या लोकांना त्यांच्या अन्नातून पुरेशी एनर्जी मिळत नाही.म्हणूनच मुबलक प्रमाणात एनर्जी मिळवण्यासाठी शरीर जास्त अन्नाची मागणी करू लागते.
थकवा येणे: टाईप 2 डायबिटीस एखाद्या व्यक्तीच्या ऊर्जेच्या पातळीवर परिणाम करू शकते आणि त्यांना थकवा जाणवू शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने डोळ्याच्या लेन्सवर सूज येऊ शकते. त्यामुळे दृष्टीमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.