Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. अशावेळी योग्य वेळी निदान करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया HbA1c म्हणजे काय.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 11:54 AM
HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

मधुमेह झाल्यानंतर कोणती चाचणी केली जाते?
HbA1c चाचणी म्हणजे काय?
दैनंदिन रक्तातील साखरेच्या पातळीशी कसे संबंधित आहेत?

मागील काही वर्षांमध्ये जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने ही लक्षणे गंभीर स्वरूप घेतात आणि आरोग्य बिघडतात. मधुमेह हा कधीही न बरा होणारा आजार आहे. आयुष्यभर कायमच गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेहाची सामान्य लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच चाचण्या करून उपचार करावेत. मधुमेह झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यातून एकदा HbA1c ही एक साधी रक्त चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. ही चाचणी केल्यानंतर सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवली जाते. चला तर जाणून घेऊया HbA1c चाचणी म्हणजे आणि ही चाचणी कशासाठी केली जाते.

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

HbA1c चाचणी म्हणजे काय?

HbA1c हे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींमधील प्रथिन असलेल्या हिमोग्लोबिनशी ग्लुकोज किती प्रमाणात जोडलेले आहे हे मोजते. तुमच्या रक्तातील साखर जितकी जास्त असेल तितकी तुमची HbA1c टक्केवारी जास्त असते. ५.७ टक्क्यांपेक्षा कमी HbA1c सामान्य मानली जाते तर “५.७ टक्के ते ६.४ टक्क्यांमधील मूल्य हे प्रीडायबिटीज दर्शवते. दोन वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे पुष्टी झालेले ६.५ टक्के किंवा त्याहून अधिक HbA1c हे मधुमेहाचे निदान आहे, असे मानले जाते. मधुमेहाचे निदान झालेल्या व्यक्तींसाठी, HbA1c ७ टक्क्यांपेक्षा कमी ठेवणे हे सामान्य लक्ष्य आहे. पण एखाद्या व्यक्तीला मधुमेह किती काळ आहे आणि इतर आरोग्य समस्यांनुसार तो बदलू शकते.

दैनंदिन रक्तातील साखरेच्या पातळीशी कसे संबंधित आहेत?

५% HbA1c म्हणजे सरासरी रक्तातील साखर सुमारे ९७ mg/dL असते.
६% म्हणजे अंदाजे १२६ mg/dL.
७% म्हणजे सुमारे १५४ mg/dL.
८% म्हणजे सरासरी १८३ mg/dL.

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

HbA1c मध्ये सुधारणा करण्यासाठी संतुलित पोषण, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, ताण व्यवस्थापन आणि आवश्यकतेनुसार योग्य औषधे घेतल्यास, पातळी लक्षणीयरीत्या सुधारू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी दर तीन ते सहा महिन्यांनी नियमित चाचण्या करून मधुमेहाची तपासणी करावी. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही, याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. रक्तातील साखरेची पातळी कायमच संतुलित ठेवण्यासाठी साखर असलेल्या गोड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मधुमेहाची लक्षणे काय आहेत?

    Ans: वारंवार लघवी होणे, जास्त तहान आणि भूक लागणे, अकारण वजन कमी होणे

  • Que: टाईप १ आणि टाईप २ मधुमेह यांमध्ये काय फरक आहे?

    Ans: शरीर इन्सुलिन तयार करत नाही, शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही .

  • Que: मधुमेहामध्ये काय खावे आणि काय टाळावे?

    Ans: फायबरयुक्त पदार्थ, पालेभाज्या, कमी गोड फळे, जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ

Web Title: What is an hba1c test learn more about what daily blood sugar has to do with it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
1

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
2

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
3

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
4

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.