फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
कार कलेक्शनच्या यादीमध्ये पुढचा खेळाडू पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांच्याकडे होंडा सिविक आहे. मागील काही महिन्यांपासून रिझवानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे पण त्याच्या नेतृत्वात संघ विशेष कामगिरी करू शकला नाही.
या यादीमध्ये पुढील नाव पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणि काळातील स्फोटक फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा शाहिद आफ्रिदीलाही महागड्या गाड्या खूप आवडतात. शाहिद आफ्रिदीकडे अनेक लक्झरी कार आहेत, ज्यामध्ये लेक्सस एलएक्स५७० चे नाव प्रथम येते.
या यादीमध्ये पहिले नाव पहिले नाव पाकिस्तानचा प्रसिद्ध फलंदाज बाबर आझमचे आहे. खेळाडूकडे अनेक महागड्या गाड्यांचा संग्रह आहे, ज्यामध्ये ऑडी ए५, लॅम्बोर्गिनी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. बाबर आझमच्या लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोर कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे २६ कोटी रुपये आहे. याशिवाय बाबर आझमकडे अनेक महागड्या बाइक्स देखील आहेत.
पाकिस्तान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि सानिया मिर्झाचा माजी पती शोएब मलिककडे टोयोटा सुप्रा आहे. सध्या तो पाकिस्तानचा सामना असल्यावर कॉमेंट्री करताना दिसतो.
पाकिस्तानचे PSL म्हणजेच पाकिस्तानी सुपर लीग लवकरच चालू होणार आहे. कार कलेक्शनच्या यादीमध्ये पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडेही अनेक गाड्या आहेत, ज्यात टोयोटा फॉर्च्युनर आणि ऑडी ए८ हायब्रिड सारख्या गाड्यांचा समावेश आहे.