नव्या नवरीसाठी श्रावण महिना खूप खास असतो. या महिन्यात खूप जास्त सणवार असतात आणि घरात वेगवेगळ्या देवतांची पूजा करून उपवास सुद्धा केला जातो. त्यातील महिलांचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. यादिवशी नातेवाईक आणि मैत्रिणींना घरी बोलावून देवीची पूजा करून वेगवेगळे पारंपरिक खेळ खेळले जातात. मंगळागौर उत्साहात साजरा करण्यासाठी नऊवारी साडी, दागिने इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे मंगळागौरीची शोभा वाढवण्यासाठी या साड्यांची नक्की खरेदी करा. यामुळे तुमचा लुक आणखीनच सुंदर दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
मंगळागौरीच्या पूजेसाठी परफेक्ट लुक! काठपदरच्या 'या' सुंदर साड्यांनी सौंदर्यात पडेल भर

भारतासह संपूर्ण जगभरात फेमस असलेली पैठणी साडी नेसायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. साडीच्या पदरावर मोर, पोपट, कमळ, नारळ आणि अशावली यांसारख्या पारंपरिक आकृत्या असतात.

सध्या नारायण पेठ साडीचा मोठा ट्रेंड आहे. प्युअरसिल्क नऊवारी नारायणपेठ साडी खरेदी करून त्यावर तुम्ही सोन्याचे दागिने, सुंदर पारंपरिक हेअर स्टाईल करत लुक करू शकता.

कांजीवरम सिल्क साडीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे मंगळागौरीला रिच आणि रॉयल लुक हवा असेल तर कांजीवरम साडी नक्की खरेदी करा.

मंगळागौरीसारख्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही बनारसी सिल्क साडीची सुद्धा निवड करू शकता. बनारसी साडीमधील रंग आणि रॉयल लुक सौंदर्यात भर पडेल.

बाजारात हल्ली सिल्क इरकल साडी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन, नक्षीकाम आणि सुंदर काठ असलेल्या साड्या उपलब्ध आहेत.






