‘फुलराणी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिलायन्स स्मार्ट बाझारने पुढाकार घेतला आहे. ‘झगा मगा मना बघा’ हा डायलॉग लिहलेले टी-शर्टस, शॅापिंग बॅग्ज, कॅप्स, जॅकेट्स वस्तूंमार्फत ‘फुलराणी’ चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे. या सगळ्या वस्तू बघून फुलराणीची भूमिका निभावणारी प्रियदर्शनी इंदलकरला खूप आनंद झाला.