Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक; दर्जेदार ऊसबियाणे निर्मितीसाठीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मयूर जगन्नाथ पाटील या युवा शेतकऱ्याने कमीत कमी क्षेत्रात ८६०३२ नीरा जातीच्या दर्जेदार ऊस बियाणाची निर्मिती करत यशस्वी प्रयोग केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 30, 2026 | 07:59 PM
Kolhapur News :  शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक; दर्जेदार ऊसबियाणे निर्मितीसाठीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
Follow Us
Close
Follow Us:
  • शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक;
  • दर्जेदार ऊसबियाणे निर्मितीसाठीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
कोल्हापूर / रोहन साजणे : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मयूर जगन्नाथ पाटील या युवा शेतकऱ्याने कमीत कमी क्षेत्रात ८६०३२ नीरा जातीच्या दर्जेदार ऊस बियाणाची निर्मिती करत त्यात स्वीट कॉर्नचे आंतरपीक घेत कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याचा नवा स्त्रोत निर्माण केला.

मयूर पाटील यांनी पारंपरिक शेतीपद्धतींचा अभ्यास करताना स्थानिक, देशी आणि नामशेष होत असलेल्या पिकांच्या जातींचे संकलन सुरू केले आहे. विविध हवामान, माती, पाण्याची उपलब्धता आणि रोगप्रतिकारक क्षमता लक्षात घेऊन त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने बीजसंवर्धन, बीज निवड आणि जतन करण्याचे प्रयोग केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऊस बियाणे, वेळोवेळी वेगवेगळ व कृषी प्र दानास भेटी देऊन माहिती घेऊन शेतीत उपयोग केला आहे. मयुर पाटील यांनी नांगरट करून चार ट्रॉली शेणखत, एक ट्रॉली कोंबडीचे खत, टाकूण मशागत करून घेतली. त्यानंतर चार फुट अंतराने २० सऱ्या सोडल्या. लागण करताना मयूर पाटील यांनी आपल्या १६ गुंठे क्षेत्रात प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब पाटील यांच्याकडून ९०० किलो उसाचे ८६०३२ नीरा जातीचे बियाणे घेतले. त्यानंतर प्रमाणानुसार खताची मात्रा देत लागण केली.

उसाची लागण उगवण झाल्यानंतर केन बूस्टरचा पंपाच्या सहाय्याने डोस दिला. दोन वेळा शेतात भांगलन करून घेतली. चार महिन्यानंतर ऊस भरणी करताना जैविक घटक असलेला बायोअर्थ, पोटॅश, युरिया असा डोस दिला. वेळोवेळी उसाच्या वाढीची काळजी घेतली. दरम्यान अवकाळी वादळाने ऊस पडला त्यावेळी एका उसाला २० कांड्या होत्या. ऊस वजनालाही चांगला होता. दर्जेदार देखभाल आणि स्वच्छता यामुळे अकराव्या महिन्यात कासारवाडीचे शेतकरी लागणीसाठी बियाणे पहायला आले. त्यांनी लागणीसाठी सर्व क्षेत्रातील ऊस नेला.

मयूर पाटील यांनी उसाचे बियाणे निर्मिती करत असतानाच यातून नवीन प्रयोग म्हणून बाजारपेठेचा अंदाज घेत चार फूट सरीच्या बाजूला शुगर ७५ जातीचे स्वीट कॉर्न (मका) टोकन केली. तीन महिन्यात ऊस पिकास कोणताही वसब न लागता व्यापारी वर्गाला न विकतास्वता बाजारपेठेत विक्री केली. त्यातून भरघोस उत्पादन मिळाले, कारखान्याला ३३०० दर असताना सुद्धा त्यांनी ४४०० रुपये प्रतिटन विक्री केली. शेतीत वडील जगन्नाथपाटील, कृषी सेवा केंद्राचे तानाजी खाडे,प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब पाटील,कृषी सहाय्यक अमोल कोरे यांचे मार्गदर्शनलाभले, असे मयूर पाटील यांनी सांगितले.

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

सोळा गुंठे क्षेत्रात ३४ टन ऊस व स्वीट कॉर्न असे १ लाख ८० हजार उत्पन्न झाले. त्यातून ७० हजार उत्पादन खर्च वजा जाता एक लाख दहा हजार निव्वळ उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी खोडवा व नेहवा यांचा वापर लागणीसाठी करू नये. लागण करताना बियाणाची निवड योग्य असावी. शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केल्यास फायदेशीर असल्याचे मयूर पाटील यांनी सांगितले.

योग्य बियाणांची निवड चागल्या उत्पन्नाचे स्रोत
बियाण्याचे निवड करत असताना नऊ ते अकरा महिन्यातील लागणीच्या बियाणाची निवड केली. ठसठसशीत असलेला कीड रोग मुक्त कांडीचा डोळा व लागण करताना कीटकनाशक बुरशीनाशक व जेविक खाताची बीजप्रक्रिया करूनच लागण केली.

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

 

Web Title: Scientific approach is necessary while farming mayur patils successful experiment for producing quality sugarcane seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण
1

सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण

शिक्षण, मनोरंजन आणि सामाजिक बदल; अभिनयाच्या पलिकडे जाऊन “क्लाऊलिंग” सारख्या कलेकडे वळले ‘हे’ कलाकार
2

शिक्षण, मनोरंजन आणि सामाजिक बदल; अभिनयाच्या पलिकडे जाऊन “क्लाऊलिंग” सारख्या कलेकडे वळले ‘हे’ कलाकार

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र! ‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्त्रीमनाची नवी मांडणी
3

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र! ‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्त्रीमनाची नवी मांडणी

Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले
4

Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.