ईशान खट्टरने (Ishaan Khattar) आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ‘पिप्पा’(Pippa) चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट10 नोव्हेंबर 2023 ला ॲमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Pippa Trailer) नुकताच रिलीज करण्यात आला आहे. भारत पाकिस्तान युद्धावर आधारित ‘द बर्निंग चाफिज’ या पुस्तकाच्या कथेवरून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. युद्धाच्या वेळी रशियन वॉर टँक ‘PT-76’ पाण्यावर एखाद्या रिकाम्या टिनच्या डब्ब्याप्रमाणे तरंगत होता. त्यावरून ‘पिप्पा’ हे नाव देण्यात आलं. या चित्रपटात ईशान खट्टरसोबत मृणाल ठाकूर, प्रियांशू पैनयुली, सोनी राजदान यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजा कृष्ण मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ए. आर. रहमान यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.